orange price dropped in washim saam tv
ऍग्रो वन

Orange Price : संत्र्याचा भाव काेसळला, वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात

Washim News : वाशिमच्या शेलुबाजार येथील संत्र्याला मोठी मागणी असते. मागच्या वर्षी चांगला दर मिळाल्यामुळे यंदाही शेतकऱ्यांनी त्याच दराची अपेक्षा केली होती.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim :

वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार (shelubazar) परिसर हा संत्र्याचा हब म्हणून ओळखला जातो. या भागातील संत्र्याला मागणी सुद्धा त्याच दर्जाची असते. मात्र, संत्र्याला मिळत असलेला कमी भाव आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या गारपीट आणि पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाशिमच्या शेलुबाजार येथील संत्र्याला मोठी मागणी असते. मागच्या वर्षी चांगला दर मिळाल्यामुळे यंदाही शेतकऱ्यांनी त्याच दराची अपेक्षा केली होती. मात्र 700 ते 800 रुपये प्रति कॅरेट मिळणारा भाव यावर्षी मात्र 200 ते 300 वर येऊन पोहोचला आहे. 30 ते 35 रुपये मिळणारा किलोला भाव आज दहा ते पंधरा रुपयावर येऊन पोहोचला आहे. (Maharashtra News)

त्यातच दोन दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटी आणि पावसामुळे होत्याच नव्हतं झाले आहे. निम्म्यावर आलेले संत्र्याचे दर हे शेतकऱ्याचा आर्थिक कणा मोडणार आहे. एकीकडे दरवाढ मिळत नसल्याने तर दुसरीकडे नैसर्गिक संकट शेतकऱ्यांवर कोसळल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला असून आता यातून शेतकरी कसा सावरणार आहे याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Aamir Khan : बॉलिवूडमध्ये खळबळ! आमिर खानच्या घरी एकाचवेळी २५ आयपीएस अधिकारी धडकले, नेमकं प्रकरण काय?

UPI Rules: UPI वापरात मोठा बदल! १ ऑगस्टपासून ५ नवे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Daily Shravan Remedies : श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य

Pune Rain : पुणेकर! समाधानकारक पाऊस झाला का? भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीत विसर्ग वाढवला

SCROLL FOR NEXT