Pimpalgaon Bajar samiti Saam tv
ऍग्रो वन

Pimpalgaon Bajar samiti : टोमॅटो उत्पादकांचे आडतदारांनी पैसे थकविले; संतप्त शेतकऱ्यांचे बाजार समिती बाहेर आंदोलन

Nashik News : लिलावात झालेल्या मालाची विक्री झाल्यानंतर तातडीने पैसे देण्यासाठी प्रसिध्द असतांना यातील अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसल्याने या शेतकऱ्यांनी निषेध करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला

Rajesh Sonwane

अजय सोनवणे

नाशिक : टोमॅटोचे उत्पादन घेतल्यानंतर त्याची बाजार समितीमध्ये विक्री करण्यात आली. विक्री लागलीच रक्कम न देता ती सोबत देण्याचे सांगण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते. नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीत टॉमॅटोचा हंगाम संपल्यानंतर पाच आडतदारांनी २३५ शेतकऱ्यांचे सुमारे २ कोटी ३० लाखाची रक्कम थकविली आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले असून शेतकऱ्यांनी आंदोलन करत पैशांची मागणी केली.  

नाशिक जिल्ह्यातील पिपंळगाव बाजार समितीच्या कार्यालय समोर आज शेतकऱ्यांनी आंदोलन करून निषेध करत पैसे देण्याची मागणी केली. दरम्यान चांदवड, निफाड, दिंडोरी, सटाणा, सिन्नर येथून टोमॅट उत्पादक आपला माल विक्रीला घेऊन येत असतात. तर लिलावात झालेल्या मालाची विक्री झाल्यानंतर तातडीने पैसे देण्यासाठी प्रसिध्द असतांना यातील अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसल्याने या शेतकऱ्यांनी निषेध करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

तुरीच्या दरात मोठी घसरण
वाशीम
: सोयाबीन आणि कापसाला अपेक्षित भाव न मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी तुरीकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले होते. मागील काही वर्षांतील चांगल्या दरामुळे तुरीच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली होती. मात्र सध्या बाजारातील बदलत्या परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. मागील काही दिवसात तुरीच्या दरात दोन ते अडीच हजार रुपयाची घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर पुढील काळात आणखी तुरीची आवक वाढण्याची शक्यता आहे. 

नवीन तूर येणे अजून बाकी 

नवीन हंगामातील तूर बाजारात येण्यापूर्वीच दर कोसळले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील आठवड्यात तुरीचे दर ९ हजार ते ९ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल होते. मात्र, आता वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला ५ हजार १५० ते ७ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहेत. तर रिसोड बाजार समितीमध्ये ६ हजार ५०० ते ७ हजार ५७५ दर मिळाले आहेत. तुरीचे दर घसरल्याने शेतकरी चिंतेत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT