Farmer Success Story Saam tv
ऍग्रो वन

Farmer Success Story : पाच एकर अद्रक शेतीतून भरघोस उत्पादन; पारंपरिक शेतीला फाटा

Nashik News : दामू भागवत यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत गेल्या चार वर्षापासून आद्रक शेतीचा प्रयोग केला आहे.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : पारंपारिक शेती करत असताना शेतीतून फारसे चांगले उत्पादन येत नाही. याला निसर्गाचा लहरीपणा देखील कारणीभूत ठरत असतो. मात्र काही शेतकरी हे पारंपरिक शेतीला फाटा देत शेतीत वेगळा प्रयोग करत यशस्वी होत असतात. अशाच प्रकारे नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अद्रक शेतीतून लाखोंचा आर्थिक फायदा करून घेतला आहे. 

नाशिकच्या (Nashik) येवला तालूक्यातील गवंडगाव येथिल शेतकरी दामू भागवत यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. दामू भागवत यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत गेल्या चार वर्षापासून आद्रक शेतीचा प्रयोग केला आहे. चार वर्षा पुर्वी एक एकर शेतीत आद्रक शेतीतून त्यांना चांगले उत्पादन व नफा मिळाला होता. यानंतर त्यांनी लागवड क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला. 

दुष्काळी परिस्थितीने गतवर्षी झाले नुकसान 

त्यानुसार भागवत यांनी मागील वर्षी संपुर्ण (Farmer) अकरा एकर शेतीत आद्रक लागवड केली. मात्र मागील वर्षी चांगला पाऊस झाला नसल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका दामू भागवत याना बसला. दुष्काळी परिस्थितीमुळे व पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना अकरा एकरमध्ये केवळ ८० लाखाचे उत्पादन मिळू शकले.  

यंदा पाच एकरात ६० लाखांचे उत्पन्न 

तरी देखील भागवत हे निराश न होता यंदा पुन्हा अद्रक लागवडीचा निर्णय घेत त्यांनी पाच एकरात पुन्हा आद्रक लागवड केली असून त्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला. यंदा पाच एकरात एक हजार क्विंटल आद्रकाचे उत्पादन निघून त्यातून ५० ते ६० लाखाचे उत्पन्न मिळेल असा विश्वास भागवत यांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO ची महत्त्वाची अपडेट! १५ मे पूर्वी 'हे' काम पूर्ण करा; अन्यथा PF आणि पेन्शनवर होईल परिणाम

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! कार ३०० फूट खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: वर्धा - आर्वी मार्गावरील पहाटेच्या सुमारास मोठा अपघात, पायदळ जाणारा व्यक्ती गंभीर जखमी

Heart Attack Signs : हार्ट अटॅक येण्याआधी शरीर देते 'हे' ५ संकेत, दुर्लक्ष करणे पडेल महागात

पंतप्रधान मोदी म्हणाले सोनं खरेदी करू नका, राहुल गांधी भडकले; म्हणाले आता देश चालवणे...

SCROLL FOR NEXT