Onion Price Saam tv
ऍग्रो वन

Onion Price : कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; लासलगाव बाजार समितीत कांद्याला उच्चांकी दर

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव परिसरात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत असते. तसेच येथील बाजार समितीत देखील कांद्यांची आवक मोठी असते

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र कांद्याच्या दराने रेकॉर्ड केला. नाशिकच्या लासलगावसह सर्वच बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याला ६ हजार तर लाल कांद्याला ५ हजार रुपये प्रतिक्विंटल उच्चांकी दर मिळाला आहे.. 

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव परिसरात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत असते. तसेच येथील (Bajar Samiti) बाजार समितीत देखील कांद्यांची आवक मोठी असते. अनेकदा शेतकऱ्यांनी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणल्यानंतर त्याला चांगला दर मिळत नसतो. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असतो. मिळेल त्या (Onion Price) दरात कांदा विक्री करावा लागत असतो. मात्र यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आनंदात आहे.  

यंदा अति पाऊस व परतीच्या पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. सध्या कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. इतर वेळी अत्यल्प दराने शेतकऱ्यांना रडवणारा कांदा काही दिवस ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे. बाजार समितीत उन्हाळी कांदा ६ हजार प्रतिक्विंटल तर लाल कांद्याला ५ हजाराचा दर मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : मुलुंडमध्ये कारच्या इंजिनमध्ये आढळला 5-6 फूट लांबीचा साप

LPG Cylinder Booking: ऑनलाइन-ऑफलाइनेही सिलिंडर बुक होत नाही? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या

गॅस सिलिंडरसाठी जास्त पैसे घेतले तर खबरदार! थेट गुन्हा दाखल होणार

Kuldeep Yadav Wedding: कुलदीप यादवची होणारी बायको कोण? मेहेंदीचे फोटोचे झाले व्हायरल

SCROLL FOR NEXT