Nandurbar Rain: अतिवृष्टीमुळे 3202 हेक्टरवरील पिकांचे नुकसान! दिनू गावित
ऍग्रो वन

Nandurbar Rain: अतिवृष्टीमुळे 3202 हेक्टरवरील पिकांचे नुकसान!

गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या अतिवृष्टीमुळे नंदुरबार जिल्ह्यात 94.7 मिलिमीटर सरासरी पाऊस झाला होता.

दिनू गावित

दिनू गावित

नंदुरबार : गुलाब चक्रीवादळामुळे Gulab Cyclone निर्माण झालेल्या अतिवृष्टीमुळे नंदुरबार Nandurbar जिल्ह्यात 94.7 मिलिमीटर सरासरी पाऊस झाला होता. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात एकूण 3202.10 हेक्‍टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हे देखील पहा-

तर महसूल विभागाद्वारे revenue department प्राथमिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये नंदुरबार तालुक्यातील 61 गावांमध्ये कांदा, पपई, कापूस, मिरची पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नवापुर Nvapur तालुक्यातील 10 गावामध्ये भात उडीद मका पिकाचे नुकसान झाले आहे. तळोदा तालुक्यातील 5 गावांमध्ये ज्वारी व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. अक्कलकुवा तालुक्यातील 19 गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे.

धडगाव तालुक्यात 38 गावांमध्ये तर सर्वात जास्त शहादा तालुक्यातील 71 गावांमध्ये फळबागा सह नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाकडून मिळणारी मदत दीर्घकालीन असते त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ सरसकट मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला; आखाती युद्ध पुन्हा भडकणार?

SCROLL FOR NEXT