सागर निकवाडे
नंदुरबार : खरीप हंगामात सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. पाऊस पडल्यानंतर पीक आत कुठे बहरू लागले आहे. यातच सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव पडल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवले असून सोयाबीन पिकावर रोग पडल्यामुळे पीक उपटून टाकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
सोयाबीन (Soyabean Crop) हे खरीप हंगामातील मुख्य पीक असून नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड करण्यात येत असते. यावर्षी देखील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली असून या पिकांवर आता येलो मोझॅक प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शहादा (shahada) तालुक्यातील बामखेडा आणि वडाली परिसरातील लागवट करण्यात करण्यात आलेल्या सोयाबीन पिकावर येलो मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून सोयाबीन पिके धोक्यात आली आहेत.
खरीप हंगामातील पहिले संकट
शेतकऱ्यावर (Farmer) अस्मानी संकट येतच राहते. हंगाम ऐन भारत असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान होत असते. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याला अधिक आर्थिक फटका बसत असतो. दरम्यान खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यावर संकट उभे राहिले आहे. सोयाबीन पिकावर या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्याने काही शेतकऱ्यांवर संपूर्ण पीक उपटून टाकण्याची वेळ आलेली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.