Farmer Saam tv
ऍग्रो वन

सालदारकी गडी निवडण्याची परंपरा; दगड गोटे उचलत तरुणांद्वारे प्रात्यक्षिके

सालदारकी गडी निवडण्याची परंपरा; दगड गोटे उचलत तरुणांद्वारे प्रात्यक्षिके

नंदुरबार दिनू गावित

नंदुरबार : मोठ्या शेतकरीकडे सालदार लावले जात असत, पुर्वी त्‍याची सुरवात अक्षय तृतीयाच्‍या दिवसापासून केली जात असे. सालदार निवडताना त्‍याला वर्षाची दिली जाणारी बोलली जायची. शिवाय सालदार गडीमध्‍ये किती ताकद आहे; याकरीता दगड उचलले जात होते. आज ही परंपरा नसली तरी परंपरेचा भाग म्‍हणून नंदुरबारमध्‍ये (Nandurbar) काही तरूणांनी त्‍याची प्रात्‍यक्षिक केली. (nandurbar news saldarki gadi Demonstrations by young people lifting stones)

खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात अक्षयतृतीया या सणाला मोठं महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीमधील साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या (Farmer) सणानिमित्त पूर्वजांपासून विविध खेळ, गाणी सादर करून सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे.‌ विशेष म्हणजे झोके बांधून खेळणे, आखाजीचे गाणे म्हणणे व पूर्वजांना स्मरण करून पुरणपोळीचा नैवेद्य देणे. यासह नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात शेती कामासाठी सालदारकी गडी निवडण्यासाठी दगडाचे गोटे उचलण्याची परंपरा आहे. ज्या गडीने जास्त ताकत लावून आपली क्षमता दाखवेल त्याला जास्त दराने सालदारकी गडी ठेवत असल्याचे परंपरा आहे. आज आधुनिक युगात सालदारकी गडी ठेवत नसले; तरी वडिलोपार्जित चालत आलेली परंपरा माळीवाडा परिसरातील तरुणांनी प्रात्यक्षिक करून अक्षय तृतीय सणाचा आनंद लुटला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT