Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar Bajar Samiti: लाल मिरचीची विक्रमी आवक; शेतकऱ्यांना दर वाढण्याची अपेक्षा

Nandurbar News : लाल मिरचीची विक्रमी आवक; शेतकऱ्यांना दर वाढण्याची अपेक्षा

Rajesh Sonwane

सागर निकवाडे  

नंदुरबार : देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. यावर्षी (Nandurbar) नंदुरबार बाजार समितीत विक्रमी मिरचीची आवक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट मिरचीची आवक होईल; असा अंदाज (Bajar Samiti) बाजार समितीच्यावतीने व्यक्त केला गेला आहे. (Maharashtra News)

नंदुरबार बाजार समितीत मागील वर्षी २२५ हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी केली गेली होती. यावर्षी हा आकडा तीन लाख क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या ८ ते १० दिवसात बाजार समितीत जवळपास ३० हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी केली गेली. यावर्षी तिला पोषक वातावरण असल्याने मिरचीचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. तसेच मिरचीला बाजार भावही चांगला मिळत असल्याने नंदुरबार सोबतच शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेशमधील (Farmer) शेतकरी मिरची खरेदीसाठी नंदुरबार बाजार समितीला प्राधान्य देत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्ह्यात ९ हजार हेक्टर क्षेत्रावर मिरची लागवड
नंदुरबार जिल्ह्यात यंदा ९ हजार हेक्टर क्षेत्रावर मिरची लागवड झाली आहे. नंदुरबार बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मिरची विक्रीस येत असून शेतकरी मिळणाऱ्या दरावर नाराज असून अजून दर वाढवून मिळावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.  मागील आठ ते दहा दिवसात ३० हजार क्विंटल मिरचीची खरेदी बाजार समितीत झाली आहे. सध्या ओल्या लाल मिरचीला अडीच ते ५ हजारपर्यंत प्रति क्‍विंटल दर वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT