Nandurbar Bajar Samiti Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar Bajar Samiti : मक्याला मिळतोय चांगला दर; नंदुरबार बाजार समितीत ७० हजार क्विंटल मक्याची खरेदी

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड करण्यात आलेली होती. पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्याला उत्पादन देखील चांगले झाले आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : शेतकऱ्याने यंदाच्या खरीप हंगामात मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. आता मक्याची काढणी केल्यानंतर बाजार समितीत विक्रीसाठी आणला जात आहे. यामुळे नंदुरबारच्या बाजार समितीत देखील मक्याची आवक वाढली आहे. आवक वाढण्यासोबत मक्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड करण्यात आलेली होती. पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्याला उत्पादन देखील चांगले झाले आहे. बहुतांश शेतकऱ्यांची मका काढणी पूर्ण झाली आहे. यामुळे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Bajar Samiti) मागील काही दिवसांपासून मक्याची आवक वाढली असून दररोज अडीचशे ते तीनशे वाहनातून तीन ते चार हजार क्विंटल मका बाजार समितीत विक्रीसाठी दाखल होत आहे. 

साडेतीन हजारापर्यंत दर 

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत ७० हजार क्विंटल मक्याची खरेदी झालेली आहे. मक्याचे दर वाढल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात मका बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहे. यावर्षी झालेला चांगला पाऊस यामुळे जिल्ह्यात मक्याच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. तर नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मक्याला २ हजार ते २ हजार ३०० रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. तर सफेद मक्याला २ हजार ४०० पासून ३ हजार ४५० पर्यंतचा दर मिळत आहे. 

दरात आणखी वाढ होण्याची शक्यता 

जिल्हाभरातून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मका विक्रीसाठी दाखल होत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे. अजून येणाऱ्या काळात मक्याचे दर वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मका खरेदी सुरू असून परिसरात चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीला पसंती दिली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?

Google Pay, PhonePe, Paytm युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, NPCI चा मोठा निर्णय; बंद होणार 'ही' महत्त्वाची सुविधा

Rain Alert : राज्यात पाऊस थैमान घालणार, ३१ जिल्ह्यांना हाय अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?

Naivedya Thali : नैवेद्याची थाळी कशी सजवावी? 'या' सोप्या ६ टिप्स गृहिणींनी लक्षात ठेवाव्यात

Fact-Check: सरकारची E-30 ची तयारी?2030 पर्यंत E-30 वापरणार?व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT