Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : नवीन मका बाजारात दाखल होताच दरात घट; पंधराशे रुपये दराने होतेय खरेदी

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार आणि शहादा बाजार समिती मोठ्या प्रमाणात मक्याचे आवक होत असते.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या मक्याच्या काढणीला आता सुरवात झाली आहे. मार्केटमध्ये चांगला दार असल्याने काढलेला मका विक्रीसाठी आणला जात आहे. मात्र नवीन मक्याची आवक सुरु होताच एक हजार रुपयांनी दरात घसरण झाली अणे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

शेतकऱ्यांचा नवीन मका बाजारात विक्रीस दाखवण्यापूर्वी मक्याला २५०० रुपये दर मिळत होता. मात्र नवीन मका बाजारात दाखल होताच मक्याच्या दरात १००० ते १२०० रुपयांनी घट झाल्याने मका उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नंदुरबार आणि शहादा बाजार समिती (Bajar samiti) मोठ्या प्रमाणात मक्याचे आवक होत असते. मात्र मक्याचे दर कमी झाल्याने शेतकरी संतप्त झाला असून शेतकऱ्यांच्या घरात माल आल्यावर भाव कसे पडतात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

मक्याला हमीभाव जाहीर करा 

मक्याला पंधराशे रुपयांचा दर मिळत असल्यास उत्पादन खर्चही निघत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. सरकारने मक्का खरेदी संदर्भात भूमिका स्पष्ट करून मक्याला हमीभाव जाहीर करावा; अशी मागणी नंदुरबार जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT