Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News: दुष्काळी परिस्थितीत भारनियमनाचा भार; पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

Nandurbar News : दुष्काळी परिस्थितीत लोडशेडिंगचा भर; पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : पाऊस नसल्याने त्याचा परिणाम सगळीकडेच झालेला पहावयास मिळत आहे. पाऊस पडत नसल्याने पिकांना पाणी देण्याचे काम शेतकरी (Farmer) करत आहे. यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली असून महावितरणकडून देखील अघोषित भारनियमन सुरु करण्यात आले आहे. एकीकडे (Nandurbar) दुष्काळी परिस्थिती तर दुसरीकडे अघोषित भारनियमन यात शेतकऱ्यांची पिकं वाचवण्यासाठी धडपड सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. (Live Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात मागील पंचवीस ते तीस दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. जेमतेम वाढविलेल्या पिकांना पाण्याची गरज असतांना पाणी नाही. यामुळे पाणी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. समाधानकारक पाऊस झाला नसल्याने विहीर आणि बोरवेलची पाणीपातळी खालवली आहे. मात्र अपूर्ण होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध असलेले पाणीही पिकांना देता येत नाही. 

आठ तास वीज तिही मिळेना 

ग्रामीण भागात शेतीसाठी अवघा आठ तास विद्युत पुरवठा (Mahavitaran) महावितरण कंपनीकडून केला जात असतो. मात्र त्यातही वीज मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवघा दोन ते चार तास विद्युत पुरवठा विद्युत केला जात आहे. अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे पाणी असूनही अनेक शेतकरी पिकांना वाचवू शकत नसल्याची स्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

अजित पवार विमान अपघाताला नवं वळण; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पुलावर अपघातमुळे मोठी वाहतूक कोंडी

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा, जय पवारांची मोठी मागणी

Bhiwandi Crime: उपमुख्यमंत्र्यांची भेट करून देतो म्हणून लॉजवर नेलं; सेना कार्यकर्त्याचा महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT