Nandurbar News Papaya Crop Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : पपई पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव; शेतकरी अडचणीत

Nandurbar News : पपई पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव; शेतकरी अडचणीत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : पावसाचा लहरीपणा मध्यंतरी पावसाने मारलेली दडी यानंतर झालेली अतिवृष्टी यामुळे पिकांचे निक्सन झाले. पपईला देखील याचा फटका बसला असून आता पपईवर विषाणूजन्य (Nandurbar) रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पपई उत्पादक (Farmer) शेतकरी अडचणीत सापडला आहे. (Latest Marathi News)

देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली जात असते. यावर्षी असलेल्या दुष्काळी परिस्थितीतही पपई उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पपई बागा जगवल्या (Papaya Crop) होत्या. मात्र पावसाने दिलेला ताण आणि त्यानंतर अतिवृष्टी सारखा झालेला पाऊस आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील पपई बागा उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

जिल्ह्यात जवळपास दहा हजार एकर पेक्षा अधिक क्षेत्रावर पपईचे लागवड केली जात असते. यातील सर्वाधिक क्षेत्र शहादा तालुक्यातील असून शहादा तालुक्यात जवळपास ४ हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली जात असते. मात्र यावर्षी शहादा तालुक्यात पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून पपईचे उत्पादन येईल का नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कमी झालेला पाऊस आणि त्यानंतर अतिवृष्टी सारखा झालेला पाऊस आता त्यातच भर म्हणून पपईवर आलेला विषाणूजन्य रोग यातून उत्पादन खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.   

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan: सलमान भाईजानचा जलवा कायम; सिनेमा रिलीज होण्याआधीच केला 300 कोटीपेक्षा जास्त गल्ला

India Tourism : हिरवगार जंगल, धबधबे, व्हॅलीचे सौंदर्य; सर्वकाही एकाच ठिकाणी, 'हे' आहे स्वर्गाहून सुंदर ठिकाण

Chandrashekhar Bawankule: बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Pooja Sawant Lovestory: आईच्या मैत्रिणीमुळे झाली ओळख, कशी आहे? पूजा सावंतची लव्हस्टोरी

Maharashtra Live News Update : सोलापुरात धावत्या कारला अचानक भीषण आग

SCROLL FOR NEXT