Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News: शेती माल खरेदी होत नसल्याने शेतकरी आक्रमक; सोयाबीन खरेदीसाठी बाजार समितीच्या आवारातच उपोषण

Nandurbar News : शेती माल खरेदी होत नसल्याने शेतकरी आक्रमक; सोयाबीन खरेदीसाठी बाजार समितीच्या आवारातच उपोषण

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल खरेदी केला (Nandurbar) जात नाही. माळ खरेदी होत नसल्याने शेतकरी (Farmer) आता चांगलाच आक्रमक झाला असून सोयाबीन खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरवात केली आहे. (Breaking Marathi News)

व्यापारी हे शेतकऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी न करता धडगाव शहरात खरेदी करतात. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचाही आरोप शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहेत. धडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांसाठी मूलभूत सुविधा नसल्यामुळे यासोबतच धान्य साठवून ठेवायला गोडाऊन नसल्याने घाणीचे साम्राज्य असल्याने व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागत असते.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार 

शासनाचा हमीभावाप्रमाणे (Soyabean) सोयाबीन खरेदी जोपर्यंत होत नाही; सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा मोबदला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले आहे. मात्र येत्या दोन दिवसात धडगाव (Bajar Samiti) बाजार समितीत लिलाव चालू करणार असल्याचे माहिती व्यापाऱ्यांच्या वतीने देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

Pitod Recipe : भाजी संपलीय? मग झटपट बनवा खमंग 'पितोड', चवीला लागेल भन्नाट

Political News: मोठी बातमी! 'त्या' २० बंडखोर खासदारांना झटका, सुप्रीम कोर्टाने बजवली नोटीस

SCROLL FOR NEXT