Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News: शेतकऱ्यांच्या उसाच्या पैशांसाठी आंदोलन; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची उपस्थिती

शेतकऱ्यांच्या उसाच्या पैशांसाठी आंदोलन; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची उपस्थिती

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : शहादा तालुक्यातील सातपुडा सहकारी साखर कारखाना नागाई शुगर्स या कंपनीने चालवायला घेतला आहे. या साखर कारखान्यात (Sugar Factory) दिलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना अजून मिळालेले नाही. शेतकऱ्यांच्या पैश्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची (Nandurbar) उपस्थितीत आज आंदोलन करण्यात आले. (Tajya Batmya)

शहादा तालुक्यातील सातपुडा सहकारी साखर कारखाना परिसरातील जवळपास १३०० शेतकऱ्यांनी या कारखान्याला आपला ऊस दिला असून गेल्या सात महिन्यापासून कारखान्याने शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट दिलेले नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यासोबत कारखान्यावर ऊसतोड करणाऱ्या कामगारांचे ही पैसे मिळाले नसल्याने आज शहादा (Shahada) तहसील कार्यालयात नर्मदा बचाव आंदोलनाच्या ज्येष्ठ नेत्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ऊसतोड कामगारांनी आंदोलन करत प्रशासन आणि कारखाना संचालकांची भेट घेतली.  

१५ टक्के व्याजाची मागणी 

प्रांत अधिकारी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत कारखान्याच्या वतीने २० ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्र शासनाच्या मूलभूत किमतीनुसार ऊसाला भाव देण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या राहिलेल्या पैशावर १५ टक्केप्रमाणे व्याज ही देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

Eexcessive sleepiness: सतत झोप येतेय? या 7 धक्कादायक कारणांमुळे तुमचं शरीर देतंय मोठा इशारा

SCROLL FOR NEXT