Farmer Cotton Price
Farmer Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News: सीसीआयकडून कापसाचे दर कमी; खरेदी बंद पाडत संतप्त शेतकऱ्यांचा रस्ता रोको

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : सीसीआयने कापसाचे खरेदी दर कमी केले. यामुळे शेतकरी संतप्‍त झाला असून नंदुरबार (Nandurbar) येथील केंद्रावर कापसाची खरेदी बंद पाडत संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला. नंदुरबार तालुक्यातील पळाशी कापुस (Cotton) खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांचा रस्ता रोको करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

गतवर्षी कापसाला (Cotton Price) बारा हजार प्रतिक्‍वींटलपर्यंत भाव मिळाला होता. यामुळे यंदा देखील दहा हजाराच्‍यावर भाव मिळेल; अशी अपेक्षा बळीराजाला (Farmer) होती. मात्र मागील महिना– दीड महिन्‍यापासून कापसाचे दर स्‍थीर आहेत. उलट दर कमी होत आहेत. यात शुक्रवारी सीसीआयची कापुस खेरदी बंद झाल्यानंतर आज सोमवारी खरेदी सुरु झाल्यानंतर तब्बल हजार ते बाराशे रुपयांनी कापसाचा भाव पडला. त्यामुळेच शेतकऱी चांगलेच संतप्त झाले.

शेतकरी महामार्गावर ठाण मांडुन

कापसाचे दर कमी झाल्‍याने संतप्‍त बळीराजाने कापूस खरेदी बंद पाडली. याशिवाय रास्‍ता रोको आंदोलन केले. तासाभरापासुन शेतकरी शेवाळी नेंत्रग महामार्गावर ठाण मांडुन आहेत. यामुळे महामार्गावर दोन किलोमीटरच्या अंतरावर रांगा लागल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Covishield Vaccine : तुम्हीही Covishield लस घेतली आहे? दुष्परिणामांसह तुमच्या जिवाला किती प्रमाणात धोका, वाचा सविस्तर

Today's Marathi News Live : ठाणे लोकसभा शिंदे गट लढणार, नरेश म्हस्केंच्या नावावर शिक्कामोर्तब

Summer Tips: उन्हाळ्यात चक्कर येण्याची समस्या ठरतेय गंभीर, कशी घ्याल काळजी?

IPL 2024 Playoffs: इंग्लंडच्या या एका निर्णयाने IPL च्या ५ संघांचं टेन्शन वाढलं; वाचा कारण

Mumbai Local Speed : हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकल प्रवास अधिक वेगवान होणार, मध्य रेल्वेचा महत्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT