Banana Crop Saam tv
ऍग्रो वन

Banana Crop : केळी बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला; केळी उत्पादक शेतकरी अडचणीत

Nandurbar News : वाढलेले तापमान आणि केळी पिकावर आलेल्या करपा रोग यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरु आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: शेतकऱ्यांवर एकामागून एक संकट उभे राहत आहे. वाढत्या तापमानाचा फटका आता फळबागांना बसू लागला असून केळी बागांचे देखील नुकसान होत आहे. सध्या केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून केली उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. वाढत्या तापमानामुळे हा प्रादुर्भाव वाढत असल्याचे शक्यता वर्तविली जात आहे. 

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. त्यातच वाढलेले तापमान आणि केळी पिकावर आलेल्या करपा रोग यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरु आहे.  

केळीचे घडही होत आहेत खराब 

करपा रोगामुळे केळीचे पाने खराब होत असल्याने घड उघडे पडत आहे. थेट सूर्यप्रकाश केळीच्या फळांवर जात असल्याने केळी खराब होत असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात शहादा तालुक्यातील अनेक भागात करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचे दिसून येत असून कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.  

शेतकऱ्यांना आर्थिक फटका 

एकीकडे केळीला चांगला दर मिळत आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांची केळी निघत आहे. त्यांना चांगला फायदा होत आहे. मात्र दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून उत्पादन खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT