Nandurbar: पंधरा एकर ऊस जळाला; आठ लाखांचे नुकसान Saam Tv
ऍग्रो वन

Nandurbar: पंधरा एकर ऊस जळाला; आठ लाखांचे नुकसान

मंदाणे शिवारात गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास १५ एकर क्षेत्रात लागवड केलेल्या उसाच्या शेताला आग लागली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नंदुरबार : मंदाणे शिवारात गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास १५ एकर क्षेत्रात लागवड केलेल्या उसाच्या शेताला आग लागली आहे. या आगीत सुमारे ८ लाखांचे नुकसान झाले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत शहादा, पानसेमल या ठिकाणी अग्निशमन दल आणि ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्यात यश आले आहे. मात्र, वारा जोराचा असल्याने आगीत संपूर्ण ऊस जळून खाक झाला आहे. शुक्रवारी सकाळी या उसाचा पंचनामा करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

वडगाव रस्त्यालगत सर्व्हे क्रमांक ४२ मध्ये गुलाबराव मोरे आणि शहादा बाजार समितीचे संचालक किशोर मोरे यांनी १५ एकर क्षेत्रात उसाची लागवड केली होती. काही दिवसांनी ऊसतोडणीचे नियोजन करण्यात आले असताना, गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उसाच्या शेताला आग लागल्याचे वृत्त गावात येऊन धडकले होते. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मिळेल त्या साधनाने आग विझविण्याकरिता मदत करण्यात येत होती.

शेतमालक देखील घटनास्थळी पोहचले होते. जोरात वारा वाहत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. पानसेमल आणि शहादा येथील पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. उसाला नुकतेच पाणी सोडले होते. त्यामुळे बंब शेतात नेण्यासाठी खूपच कसरत करावी लागली होती. सायंकाळी उशिरापर्यंत आग विझविण्यात यश आले.

तोपर्यंत मोठ्या प्रमाणात ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. मंडलाधिकारी सुनील खैरनार आणि तलाठी एच. पी. धनगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्यात आली आहे. नुकसानीचा पंचनामा करून, तहसील कार्यालयात अहवाल सादर केला आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT