नंदुरबार : धडगाव येथे पारंपारिक बी-बियाण्यांचे प्रदर्शन दिनू गावित
ऍग्रो वन

नंदुरबार : धडगाव येथे पारंपारिक बी-बियाण्यांचे प्रदर्शन

विज्ञानातून नवीन बियाण्यांचा शोध व संकरित बियाण्यांच्या दुनियेतही सातपुडा अतिदुर्गम भागात आजही पारंपारिक बियाण्यांपासून शेती करून बियाण्यांचे संकलन करून नवीन पिढीसाठी आदर्श ठेवला जात आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : विज्ञानातून नवीन बियाण्यांचा शोध व संकरित बियाण्यांच्या दुनियेतही सातपुडा अतिदुर्गम भागात आजही पारंपारिक बियाण्यांपासून शेती करून बियाण्यांचे संकलन करून नवीन पिढीसाठी आदर्श ठेवला जात आहे. नवीन पिढीला पारंपारिक बियाण्यांची ओळख व्हावी या उद्देशाने धडगाव येथे बायफ संस्था व जनार्दन पोहल्या वळवी महाविद्यालय धडगाव येथील वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपारिक बियाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले.

हे देखील पहा :

यामध्ये पारंपारिक बियाणे संकलन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी भाग घेतला होता. आजच्या युगात खायला तर दूर पाहायलाही न मिळणाऱ्या अशा आधुनिक पारंपारिक बियाण्यांची मेजवानी या ठिकाणी पाहायला मिळाली. यामध्ये ज्वारी, दादर, मका, बाजरी, तांदूळ, बट्टी, हाँगरी, मुर, बादी, उडीद, चवळी, मूग, भुईमूग, हरभरा, तूर, भेंडी, बेंड्या, ढुनखा. यासोबतच फुल बिया, काकडी बिया, चारोळी, ढुल्या चिपा, चापडू, डुनखा भाजी आदी बियाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

सातपुडा अतिदुर्गम भागात आजही अनेक व्यक्ती व संस्थांकडून पारंपारिक बियाण्यांचे जतन करून शेतीसाठी उपयोगात आणले जाते. बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या संकरित बियाण्यांना फाटा देऊन पारंपारिक बियाण्यांचा नवीन पिढीने वापर करून पर्यावरण व जैवविविधता टिकविण्यासाठी पारंपारिक शेतीकडे वळावे असा संदेश या प्रदर्शनातून देण्यात आला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT