Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price : भाव नसल्याने कापूस घरात पडून; शेतकरी आर्थिक संकटात

Nandurbar News : यंदाच्या हंगामात अगदी सुरवातीपासूनच कापसाला चांगला भाव मिळाला नाही. सुरवातीला ७ ते साडेसात हजार इतका दार राहिला. मात्र त्यानंतर सातत्याने कापसाच्या दारात घसरण

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : शेतकऱ्यांचे पांढर सोनं म्हणून ओळख असलेल्या कापसाला यंदा अजूनही चांगला भाव मिळत नाही. यामुळे (Farmer) शेतकरी कापूस घरातच साठवणूक करून ठेवत आहे. परंतु कापूस किती दिवस घरात (Nandurbar) साठवणूक करून ठेवणार असा देखील आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Tajya Batmya)

यंदाच्या हंगामात अगदी सुरवातीपासूनच कापसाला चांगला भाव (Cotton Price) मिळाला नाही. सुरवातीला ७ ते साडेसात हजार इतका दार राहिला. मात्र त्यानंतर सातत्याने कापसाच्या दारात घसरण होत गेली. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवणूक केली. ही साठवणूक करून ठेवत असल्यामुळे कापसाची कॉलिटी खराब होणार, त्यामुळे कापसाला भाव मिळणार का? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे दुहेरी संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कापसाला सध्या सहा हजार ते ७ हजार पर्यंतच भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघत नसल्यामुळे कापूस विक्रीकडे पाठ फिरवला असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात यावर्षी अवकाळी पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मोठं नुकसान झालं होतं. तर दुष्काळात तेरावा महिना अशी गत शेतकऱ्यांसमोर उद्भवली आहे. दुष्काळामुळे कसंतरी कापूस पीक जगावलं मात्र कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT