नंदुरबार : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरीचे भूमिपूजन व जलपूजन कार्यक्रम दिनू गावित
ऍग्रो वन

नंदुरबार : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरीचे भूमिपूजन व जलपूजन कार्यक्रम

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून शेती सिंचनासाठी विहिरीचा लाभ दिला जातो.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांतर्गत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विविध योजनांची नागरिकांना अधिक माहिती मिळावी यासाठी नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील ठाणेपाडा येथे रमाबाई मलू पवार यांच्या विहिरीचे भूमिपूजन व ताराबाई गजू गावित यांच्या विहिरीचे जलपूजन कार्यक्रम करण्यात आला.

हे देखील पाहा :

ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात राहणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे (Farmers) जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या शेतीमध्ये पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून शेती सिंचनासाठी विहिरीचा लाभ दिला जातो. जेणेकरून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल यासाठी नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या (ZP) माध्यमातून दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले जात आहे.

यावेळी अध्यक्ष ऍड.सीमा वळवी, उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन कृषी सभापती गणेश पराडके, महिला बाल कल्याण समिती सभापती निर्मला राऊत, सदस्य देवमन पवार, कृषी अधिकारी प्रदीप लाटे यांच्या स्थानिक सरपंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT