Strawberry Farming Saam tv
ऍग्रो वन

Strawberry Farming : तरुण शेतकऱ्याचा स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग; बांधावर मिळतोय ४०० रुपये प्रतिकिलो भाव

Nanded News : पारंपरिक शेती करण्यापेक्षा यात वेगवेगळे प्रयोग करून शेती केल्यास फायदा होऊ शकतो. याचे उदाहरण नांदेडमधील बारड गावातील बालाजी उपवार हा तरुण शेतकरी. नोकरी न लागल्यामुळे शेती व्यवसाय करत आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: महाबळेश्वर सारख्या थंड वातावरण येणारी स्ट्रॉबेरी मराठवाड्या सारख्या परिसरात पहावयास मिळत नाही. मात्र नांदेड जिल्ह्यातील बारड येथील बालाजी उपवार या तरुण शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. योग्य शास्त्रीय पद्धतीने लागवड करून आता हा शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीतून आर्थिक उन्नती साधत आहेत.

पारंपरिक शेती करण्यापेक्षा यात वेगवेगळे प्रयोग करून शेती केल्यास फायदा होऊ शकतो. याचे उत्तम उदाहरण नांदेडमधील बारड गावातील बालाजी उपवार हा तरुण शेतकरी. बालाजी उपवार या तरुण शेतकऱ्याचे बी.एससी ऍग्रीपर्यंत शिक्षण झाले आहे. नोकरी न लागल्यामुळे शेती व्यवसाय करत आहे. शिक्षणाचा फायदा शेतीत करण्याच्या विचारातून बालाजी याने शेतात स्ट्रॉबेरीचे उत्पादन करण्याचे ठरविले. त्यानुसार स्ट्रॉबेरी लागवड केली. 

पाच वर्षांपासून स्ट्रॉबेरी शेती 

बालाजी उपवार हे मागील पाच वर्षापासून आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड करीत आहे. सुरुवातीला उपवार या शेतकऱ्याला अनेकांनी वेड्यात काढले. परंतु जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्याने आपल्या शेतात स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. स्ट्रॉबेरी शेती करताना योग्य नियोजन व संगोपन करत या शेतीतून चांगले उत्पादन घेत आहेत. यामुळे हि शेती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी देखील येत आहेत. 

शेताच्या बांधावरून ४०० रुपये दराने विक्री 

मागील पाच वर्षांपासून स्ट्रॉबेरी शेती करत असल्याने याचा अनुभव आला आहे. यामुळे यंदा उपवार याने आपल्या १५ गुंठे शेतीत स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. उपवार या शेतकऱ्याच्या स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे. थेट शेतीच्या बंधावरूनच ४०० किलो दराने स्ट्रॉबेरीची विक्री होत असल्याचे बालाजी उपवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अधिकाऱ्यांना मारले, आता फेरीवाले आम्हाला पण मारणार, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची महासभेत विनवणी

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT