Tomato Farming Saam tv
ऍग्रो वन

Tomato Farming : टोमॅटोच्या शेतावर फिरवला रोटाव्हेटर; शेतकऱ्यांचे दोन कोटींच्यावर नुकसान

Nanded News : गावातील साठ ते सत्तर शेतकऱ्यांनी टमाटा लागवड केली असून टोमॅटो परिपक्व होऊन लाल झाला यामुळे त्याची तोडणी करून मार्केटमध्ये नेण्याच्या तयारीत शेतकरी होता मात्र टोमॅटोवर रोगाचा प्रादुर्भाव

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: टोमॅटोची पांगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पांगरी गावात शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. टोमॅटोने भरलेल्या उभ्या पिकांवर रोटाव्हेटर फिरविण्याची वेळ आली आहे. टोमॅटोवर रोग पडल्याने त्याला भाव मिळत नसल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. यामुळे टोमॅटोवर रोटोव्हेटर फिरविण्याचा निर्णय शेतकऱ्याने घेतला. यातून दोन कोटींच्यावर नुकसान होण्याचा अंदाज आहे. 

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पांगरी या गावात टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्यात येत असते. येथील बहुतेक शेतकरी हे टोमॅटो शेती करत असतात. या गावातील साठ ते सत्तर शेतकऱ्यांनी टमाटा लागवड केली असून आता टोमॅटो परिपक्व होऊन लाल झाला आहे. यामुळे त्याची तोडणी करून मार्केटमध्ये नेण्याच्या तयारीत शेतकरी होता, मात्र टोमॅटो लाल झाला असून त्यावर रोगाचा प्रादुर्भाव पडल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

शेतकऱ्यांचे दोन कोटीपर्यंत नुकसान 

पिकलेल्या टोमॅटोवर पांढरे डाग पडत असल्याने बाजारात टोमॅटो दोन रुपये प्रति किलो या दराने विकावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघत नसल्याने टोमॅटोवर रोटाव्हेटर फिरवल्याने शेतात लाल चिखल होत आहे. गावातील साथ ते सत्तर शेतकऱ्यांनी लागवड करत सुमारे तीस ते चाळीस लाखांचा लागवडी खर्च व सुमारे दीड ते दोन कोटींच्यावर उत्पन्नावर पाणी फेरले आहे.या आर्थिक फटाक्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

पंचनामे करून भरपाईची मागणी 

टोमॅटोच्या २५ किलोच्या एका कॅरेटला साठ ते सत्तर रुपये मिळत आहेत. यात तोडणी व वाहतुकीचा खर्च निघत नाही. लागवड खर्च व उत्पन्न तर वेगळेच राहिले आहे. गावातील सुमारे साठ ते सत्तर शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. मात्र आता उत्पन्न येणार नसल्याने प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

22 वर्षीय महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू; कुटुंबीय, नातेवाईकांचा गोंधळ, मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवला

Mumbai To Shirdi : साईनगरी शिर्डीला जाताय? मुंबईहून कमी खर्चात 'या' सोप्या मार्गाने करा प्रवास

Maharashtra News Live Update : कल्याण बुद्धभूमी फाऊंडेशन प्रकरण; बुद्धभूमीकडून १५ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा

खुशखबर! लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर

Mumbai Women's T20 League: सोबो मुंबई फाल्कन्सच्या महिलांनी रचला इतिहास, पहिल्याच मुंबई लीगमध्ये शानदार विजेतेपदाचा मान

SCROLL FOR NEXT