कृषीपांपचा वीज पुरवठा खंडित Saam tv
ऍग्रो वन

Nanded News: कृषीपांपचा वीज पुरवठा खंडित; शेतकऱ्याचा गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न

कृषीपांपचा वीज पुरवठा खंडित; शेतकऱ्याचा गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

नांदेड : शेतातील कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याने एका शेतकऱ्याने विज वितरण कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Tajya Batmya)

नांदेडच्या अर्धापूर इथली ही घटना आहे. अर्धापूर तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील शेतकरी केराबा भुसे या शेतकऱ्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला आहे. तिथे असलेल्या नागरिकांनी त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. केरबा भुसे यांच्या शेतात मागील १२ दिवसांपासून वीज पुरवठा नाहीय.

वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष

शेतात केळीचे पीक आहे. परंतु वीज पुरवठा खंडित असल्याने केळी वाळायला लागली. अनेकवेळा वीज वितरण कंपनीकडे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केरबा भुसे या शेतकऱ्यांनी केली. पण वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: इंदापुरातील बेकायदेशीर गणेश मंदिर आणि मूर्ती हटवली...

समुद्रातल्या जहाजात चोरी करायला गेले, चार चोरांचा मृत्यू; मुंबईतील खळबळजनक घटना

Apple Vs Guava: सफरंचद की पेरू, डायबिटीजच्या रूग्णांनी कोणते फळ खावे?

Property Registration : जमिनीच्या खरेदी-विक्री, वाटणीसह ६३ प्रकारच्या नोंदीसाठी आधार सक्तीचे, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Raigad Fort : तटबंदी नाही, बुरुज नाहीत; तरीही खास आहे रायगडचा 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT