Nanded News Groundnuts  Saam tv
ऍग्रो वन

Nanded News: सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे भुईमुगाला फटका

सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे भुईमुंगला फटका

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

नांदेड : गेल्‍या दोन– तीन महिन्‍यांपासून हवामानात सातत्‍याने बदल होत आहे. कधी ढगाळ वातावरण तर कधी अवकाळी पावसाचा (Rain) फटका बसत आहे. त्‍यानुसार बदलत असलेल्‍या वातावरणामुळे (Nanded News) नांदेड जिल्ह्यात भुईमुंगाच्‍या पिकाला मोठा फटका बसला आहे. (Tajya Batmya)

यंदाच्‍या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्‍टीमुळे खरीप हंगाम हातातून गेला आहे. यानंतर रब्‍बी हंगामात चांगले उत्‍पन्‍न येईल; अशी आशा होती. परंतु, सातत्‍याने हवामानातील बदल व अवकाळी पावसामुळे रब्‍बी हंगाम देखील चांगला आला नाही. यात उन्हाळी भुईमुंगाच्या पिकाकडून शेतकऱ्यांना (Farmer) मोठी अपेक्षा होती. मात्र अस्मानी संकटामुळे भुईमुंग पिकावर केलेला खर्च ही निघेल की नाही? असे चिन्हे दिसत आहेत.

अपेक्षित फळधारणा नाही

मागील दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण यासारख्या सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा भुईमुंगाच्या पिकाला मोठा फटका बसलाय. भुईमुंग पिकाला अपेक्षित अशी फळधारणा झाली नसल्याने उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे नांदेड मधला भुईमुंग उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya nakshatra gochar: सूर्याच्या नक्षत्र बदलाने 'या' राशींचं नशीब चमकणार; 'या' राशींच्या हाती येणार बक्कळ पैसा

Weather update : कुठे थंडीची चाहूल तर कुठे मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा इशारा काय?

Daily Horoscope: 'या' राशींवर देवी लक्ष्मी होणार प्रसन्न, पैशाची चणचण भासणारच नाही; वाचा तुमचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: विधानसभेसाठी मनोज जरांगेंचा फुलप्रुफ प्लॅन, मविआला बसणार फटका? वाचा स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar: निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला मोठा दिलासा; Trumpet च्या चिन्हाचं भाषांत्तर 'ट्रम्पेट' च

SCROLL FOR NEXT