Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price : कापसाच्या दरात एक हजाराची घसरण; शेतकरी अडचणीत

nanded News : नांदेड जिल्ह्यात यंदाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली दिसून येत आहे. सुरवातीला म्हणजे अति पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे असलेले संकट वाढतच चालले आहे. यंदा अति पावसामुळे उत्पादनात घट झाली असताना कापसाला सुरुवातीपासून चांगला भाव नाही. यात आता शेतकरी कापूस विक्रीसाठी मार्केटमध्ये आणू लागला असताना कापसाच्या दरात घसरण झाली आहे. यात नांदेडच्या मार्केटमध्ये प्रतिक्विंटल मागे एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. 

नांदेड (Nanded) जिल्ह्यात यंदाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली दिसून येत आहे. सुरवातीला म्हणजे अति पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय अधिक पाऊस झाल्यामुळे फुलधारणा देखील कमी झालेली पाहण्यास मिळाली. परिणामी यंदा कापूस उत्पादनात घट झाली आहे. यातच यंदा (Cotton Price) सुरुवातीपासून भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.    

एक हजार रुपयांची घसरण 

चांगल्या बाजारभावाच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. सद्यस्थितीत कापूस बाजारभावात चढ- उतार सुरूच असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सध्या कापसाच्या दरात क्विंटल मागे एक हजार रूपयाची घसरण झाली आहे. जिल्ह्यात काही दिवसापुर्वी कापसाला ७ हजार ५०० रूपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. मात्र आता कापसाच्या दरात मोठी घसरण झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात कापसाला ६ हजार ५०० रूपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. 

शेतकरी अडचणीत 

यंदा कापसाला चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी कापूस घरात भरून ठेवत आहे. यातच आता क्विंटल मागे एक हजार रूपयांची घसरण झाल्याने कापुस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT