moong saam tv
ऍग्रो वन

Moong Market : मुगाच्या दरात तेजी तरीही शेतक-यांत नाराजी

dhule krushi utpanna bazar samiti : कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाची आवक 50 टक्क्यांनी घटली आहे.

भूषण अहिरे

Dhule News : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाचे दर वाढल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. परंतु पावसा अभावी मूगाचे उत्पन्न घटल्याने त्याचा फारसा फायदा शेतक-यांना हाेणार नसल्याचे स्पष्ट जाणवत आहे. (Maharashtra News)

शिंदखेडा तालुक्यात मूग, उडीदला प्रतिक्विंटल 12 हजारांच्या आसपास भाव मिळत आहे. यावर्षी अपूर्ण पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना (farmers) यावेळी चांगले उत्पादन झाले नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यंदा तालुका कृषी विभागाला मुगाचे 4,500 हेक्टर क्षेत्र अपेक्षित होते. त्यात घट होऊन 2,786 हेक्टरच मुगाचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत मुगाची आवक 50 टक्क्यांनी घटली आहे.

यंदा भाव मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट म्हणजेच 12 हजारांपर्यंत मिळत आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने मुगाला प्रतिक्विंटल 12 हजार रुपये भाव मिळत असला तरी उत्पादन नसल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नसल्याचेच दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:एसआयआर मोहिमेदरम्यान महिला बीएलओला धक्काबुक्की, मायलेकीवर गुन्हा दाखल

Marathi Actress : 'वीण दोघांतली ही तुटेना' फेम अभिनेत्रीने खरेदी केली लग्जरी कार, नव्याकोऱ्या गाडीसोबत शेअर केला PHOTO

Crime News: स्मार्ट सिटी दाखवतो म्हणत सोबत नेलं, खोलीत कोंडून ठेवत ४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार नंतर...

अमरावतीत भरदिवसा थरार! तरुणाची निर्घृण हत्या, हाताचा पंजाच छाटल्याने उडाली खळबळ

किडनी खराब होऊ नये म्हणून दिवसभरात किती पाणी प्यावे?

SCROLL FOR NEXT