दिलीप धोत्रे, मनसे - Saam Tv
ऍग्रो वन

..तर वीज मंडळ अधिकाऱ्यांना झाडाला बांधून मारु!

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वीज कंपनीच्या वीज तोडणी मोजणीच्या विरोधात पुढे सरसावली आहे

भारत नागणे

पंढरपूर : शेती पंपाचा वीज पुरवठा तोडाल तर याद राखा, शेतकऱ्यांची वीज वितरण कंपनीकडे लाखो रुपयांचे येणे असताना जर वीज पुरवठा खंडित केला तर वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना झाडाला बांधून मारू असा गर्भित इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आज पंढरपुरात दिला.

थकीत वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने मोहीम सुरू केली आहे सोलापूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे खरीप पिके जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना वीज कंपनीच्या वीज तोडणी मोजणीच्या विरोधात पुढे सरसावली आहे.

विजेचे खांब आणि डीपी यासाठी वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना भाडे मिळणे अपेक्षित असताना उलट शेतकऱ्यांकडून वीज बिल वसुली साठी शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे, हे यापुढे आता खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

शेती पंपाचा वीज पुरवठा तोडाल तर याद राखा असा सूचक इशारा देत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना झाडाला बांधून मारू असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे मनसेच्या इशाऱ्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Amit Golwalkar

हे देखिल पहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT