लष्करी आळीच्या हल्ल्याने मका उत्पादक शेतकरी अडचणीत विनोद जिरे
ऍग्रो वन

लष्करी आळीच्या हल्ल्याने मका उत्पादक शेतकरी अडचणीत

मका पीक धोक्यात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड - मका पिकावर maize crop पान खाणाऱ्या लष्करी आळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांसमोर farmer नवे संकट उभे राहिले आहे. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मका लागवड केली जाते. जनावरांना हिरवा चारा आणि खाद्य निर्मितीसाठी शेतकरी मका लागवड करतात. या वर्षी मात्र मका पिकावर लष्करी अळीने हल्ला केल्याने, मका पीक धोक्यात आले आहे.

या आळीपासून पिकाच संरक्षण व्हावे यासाठी कीटकनाशके फवारणीचे काम शेतकरी करत आहेत. मात्र याचा मका उत्पादनावर परिणाम होणार आहे. कृषी विभागाने या आळीच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. असे उदंड वडगाव येथील शेतकरी नंदलाल चव्हाण यांनी सांगितले.

हे देखील पहा -

उदंड वडगाव येथील नंदलाल चव्हाण यांच्याकडे दोन एकर मका लागवड केली आहे. वेळेवर पाऊस पडल्यामुळे मका पीक ऐन जोमात आहे. मात्र लष्करी आळीच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कणीस लागण्या अगोदरच, लष्करी आळीने पाने खाऊन घेतल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मका पशुखाद्य निर्मितीसाठी पेरली होती. नंदलाल चव्हाण यांच्यासारखे परिसरातील शेकडो शेतकरी आहेत, ज्यांनी मका पेरणी केली आहे. दरम्यान आता या नव्या लष्करी अळीचा संकटाने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरात अवकाळीसोबत गारांचा वर्षाव

Shocking : भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, राजकारणात मोठी खळबळ

भाजपमध्ये पडली उभी फूट, मोदींना हटवण्यासाठी षडयंत्र; बड्या राजकीय नेत्याच्या आरोपाने राजकारणात खळबळ

"माझ्याकडे अभिनेत्री म्हणून पाहत नाहीत...", बॉलिवूडची प्रसिद्ध Actress असं का म्हणाली?

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT