Lumpy Skin, Washim  Saam tv
ऍग्रो वन

Lumpy Skin Disease : वाशिम जिल्ह्यात लम्पीचा शिरकाव; प्रशासन अलर्ट, जनावरांचा बाजार, वाहतुकीवर बंदी

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गाई आणि म्हशींमध्ये लम्पी रोगाचा फैलाव वेगाने होत असल्याचे चित्र आहे.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim News : वाशिम जिल्ह्यात लम्पी चर्मरोग याचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून जनावरांचा बाजार बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. या आदेशात जनावरांची वाहतुक देखील बंद ठेवावी असे जिल्हाधिकारी यांनी नमूद केले आहे. (Maharashtra News)

वाशिम जिल्हयाच्या सर्व सहा तालुक्यातील ३३ ईपी सेंटरमध्ये गोवर्गीय पशुधन लम्पी चर्मरोगाने बाधित झाल्याचे आढळून आले आहे. या रोगाचा प्रसार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी जिल्हयात जवळच्या जिल्हयातून होणाऱ्या वाहतुकीमुळे इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. (ias bhuvaneshwari s) यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्हयातील सहाही तालुक्यातील गोवर्गीय पशुधनाच्या खरेदी विक्रीचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

लम्पी चर्मरोग या रोगाची लागण म्हैसवर्ग,शेळी व मेढयांमध्ये होत नसल्याने त्यांच्या खरेदी विक्रीचे बाजार नेहमीप्रमाणे सुरु राहतील असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा बुवनेश्वरी एस. यांनी कळविले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Winter Skin Care : हिवाळ्यात मेकअप कसा टिकवावा? जाणून घ्या टिप्स

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

ZP And Municipal Elections: निवडणुकीत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन; झेडपी, महापालिका निवडणूक लांबणीवर?

SCROLL FOR NEXT