Soyabean Crop Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Crop : सोयाबीन पिकावर कीड आळीचा प्रादुर्भाव; शेतकऱ्याचे होतेय नुकसान

Latur News : लातूर जिल्ह्यात यंदा सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. यंदा सोयाबीनचे चांगले उत्पन्न येण्याची शेतकऱ्याला अपेक्षा आहे.

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : लातूर जिल्ह्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. पावसामुळे सोयाबीनचे पीक चांगल्या प्रकारे बहरले आहे. मात्र पिकावर आता कीड अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. सोयाबीनवर अळी पडल्याने ती पाने कुरतडत आहे. आता फुल लागण्याची वेळ आल्याने फुलांवर देखील कीड दिसून येत असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे.

लातूर (Latur) जिल्ह्यात यंदा सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. यंदा सोयाबीनचे चांगले उत्पन्न येण्याची शेतकऱ्याला अपेक्षा आहे. दरम्यान जिल्ह्यातील उदगीर, रेनापुर परिसरातील (Soyabean Crop) सोयाबीन पिकावर कीड अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. कवळ्या पिकावरील कीड रोगामुळे जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. तर अशा प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्याने पिकावर औषधाची फवारणी करावी; असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

शेतकरी संकटात 

सोयाबीन पिकावर पडलेल्या आळीचे नियंत्रण करण्यासाठी (Farmer) शेतकरी महागडी औषधी घेऊन फवारणी करण्याच्या तयारीत आहे. मात्र कृषी विभागाच्या सल्ल्यानेच फवारणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान आळी पडल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षपदाचा निर्णय झाला का? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

Maharashtra Live News Update: अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाचे शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतले शैक्षणिक पालकत्वं

Monday Horoscope: कामाचा ताण वाढेल, 5 राशी होणार मालामाल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Hair Fall: केसांच्या वाढण्यासाठी 'हा' बेस्ट होममेड हेअर मास्क नक्की ट्राय करा, केस गळती होईल कमी

KDMCमध्ये बॅनर वॉर; राजकारणातील 'बाजीगर'; शिंदेंनी भाजपला डिवचलं

SCROLL FOR NEXT