nashik, kanda, onion, lasalgoan bazar samiti saam tv
ऍग्रो वन

Lasalgaon News : आजपासून लासलगाव बाजार समितीचे व्यवहार बंद; जाणून घ्या कारण

व्यापा-यांच्या मागणीस बाजार समितीने संमती दिली.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Lasalgaon Onion Market Marathi News : आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजार पेठ असलेली नाशिक (nashik) येथील लासलगाव बाजार समिती (lasalgaon bazar samiti) आजपासून (१ एप्रिल) ४ एप्रिलपर्यंत असे चार दिवस बंद राहणार आहे. तरी शेतक-यांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन बाजार समितीने केले आहे. (Breaking Marathi News)

येत्या चार दिवसांत कांद्यासह अन्य धान्याचे कुठलेही लिलाव होणार नाहीत असे बाजार समितीने कळविले आहे. व्यापा-यांनी आगामी बँकांच्या सुट्टया तसेच महावीर जयंतीच्या निमित्ताने बाजार समितीला या संदर्भात केलेल्या विनंती नुसार बाजार समितीने सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे.

आर्थिक वर्षाच्या अखेरीस व्यापारी चार ते पाच दिवस लिलाव बंद ठेवत असतात. मात्र ३१ मार्चपर्यंत सरकारी अनुदानाचा लाभ शेतक-यांना मिळावा म्हणून व्यापा-यांनी काल पर्यंत लिलाव सुरु ठेवले होते. दरम्यान आगामी काळातील सुटी लक्षात व्यापा-यांनी बाजार समितीस पुढील चार दिवस व्यवहार बंद ठेवण्याची विनंती केली हाेती. त्यास बाजार समितीने संमती दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

SCROLL FOR NEXT