कामरगाव गणेश मंडळाने सोयाबीनपासून पर्यावरणपूरक बनविला इकोफ्रेंडली बाप्पा...  गजानन भोयर
ऍग्रो वन

कामरगाव गणेश मंडळाने सोयाबीनपासून पर्यावरणपूरक बनविला इकोफ्रेंडली बाप्पा...

सोयाबीनच्या बाजारभावाने गाठलेला विक्रमी पल्ला, हा पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यानं करिता सुखद धक्का

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम : सोयाबीनच्या बाजारभावाने गाठलेला विक्रमी पल्ला, हा पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यानं करिता सुखद धक्का आहे. सोयाबीनचे हेच बाजारभाव कायम राहावे. याकरीता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चक्क सोयाबीनच्या दाण्यांपासून बाप्पा साकारत त्यांना साकडे घातले आहे. या संकल्पनेतून कामरगाव येथील शिवाजी चौक गणेश मंडळाने पर्यावरण पूरक इको- फ्रेंडली खूपच कमीत- कमी खर्चात गणेश मूर्तीची निर्मिती करण्यात आली आहे.

सोयाबीन पासून मूर्ती तयार करण्याकरिता ७ किलो सोयाबीन लागले आहे. शंभर रुपयाचे फेविकॉल आणि 100 रुपयाचा पांढरा कापड असे मूर्ती तयार करण्याकरिता 900 रुपये खर्च आला आहे. ७ किलो सोयाबीनचे आधी दाणे मोजले असता. त्यामधून 77 हजार सोयाबीनचे पिवळसर दाणे गणेश मूर्तीला लावण्यात आले आहे.

हे देखील पहा-

मंडळाचे सदस्य सांगतात की, सर्व शेतकर्‍यांच्या वतीने यावर्षी सोयाबीनला दहा हजार रुपयांच्या भाव मिळू दे, असे साकडे जय भवानी जय शिवाजी या गणेश मंडळाने गणपती बाप्पाला घातले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी असणाऱ्या सोयाबीनचे मागील हंगामात अपेक्षित उत्पन्न हाती न आल्याने किंवा अचानक मागणी वाढल्याने सोयाबीनच्या बाजारभावाने विक्रमी वाटचाल करत 10 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाही आनंदाची बाब आहे. सोयाबीनचे हे बाजारभाव कायम राहावे. याकरीता वाशीम जिल्ह्यातील कामरगाव येथील शेतकऱ्यांनी चक्क सोयाबीन पासून बाप्पाची आकर्षक मूर्ती साकारत बाप्पांना साकडे घातले आहे. कोणत्याही प्रकारची कृत्रिम रंग किंवा साहित्याचा वापर न करता ही मूर्ती साकारण्यात आली आहे. बाप्पा भक्तांचे आकर्षण ठरले आहे.

तर जगावरील कोरोनाच्या विघ्नाचे हरण करून शेतकऱ्यांसह सर्वांना सुख- समृद्धी बाप्पा प्रदान करतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पश्चिम वऱ्हाडात कपाशी नंतर नगदीचे पीक म्हणून, शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतात. कमी अधिक पावसाळा तसेच मध्यम पोताच्या जमिनीत समाधानकारक उत्पन्न देणाऱ्या सोयाबीन पिकाने येथील शेतकऱ्यांची आर्थिक घडी सावरण्यात मोलाची मदत केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा वांग्याचे कुरकुरीत काप; सोपी आणि चवदार रेसिपी!

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT