Cotton crop Saam tv
ऍग्रो वन

Cotton crop : यंदा पांढऱ्या सोन्याचे भरघोस उत्पन्नाची अपेक्षा; पावसामुळे मात्र नुकसानीचीही भीती

Jalgaon News : यंदा आल्हाददायक झालेला पावसाळा खरिपासह बागायती पिकांसाठी शेतकऱ्यांना अनुकूल ठरत आहे.

संजय महाजन

रावेर (जळगाव) : यंदा सुरुवातीपासूनचा चांगला पाऊस होत आहे. यामुळे खरीप हंगाम चांगला येण्याची आशा आहे. जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने केली व कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यानुसार कपाशीचे चांगले उतपादन येईल असा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना देखील चांगल्या उत्पादनाची आशा आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे नुकसानीची भीती देखील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

यंदा आल्हाददायक झालेला पावसाळा खरिपासह बागायती पिकांसाठी शेतकऱ्यांना अनुकूल ठरत आहे. यावर्षी (Raver) रावेर तालुक्यात सुमारे १७ हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली आहे. मात्र हंगामाच्या शेवट पावसाने झाल्यास नुकसान होईल; अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत पिकांची झालेली वाढ व निरोगी दिसत असलेली डौलदार कपाशीचे पीक पांढऱ्या सोन्याचा हंगाम चांगला येणार असल्याची शाश्वती देत आहे. मात्र रावेर तालुक्यात बागायती कपाशी (Cotton crop) मे महिन्यापासून लागवड सुरु केली जाते. तर खरीप क्षेत्रात जूनच्या पावसावर अवलंबून लागवड होते. त्याप्रमाणे यावर्षी सुरुवातीचा पाऊस (Rain) तुटक व सरासरीत कमी होत गेला तरी सर्व पिकांना पोषक ठरला आहे, 

सद्यस्थितीला पिकांची स्थिती चांगली आहे. त्यातच शेतकऱ्यांना दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी आर्थिक बळ देणारे नगदी पिक म्हणून पांढरे सोने हातात असते. त्याच पांढऱ्या सोन्याचा हंगाम सद्यस्थितीत चांगला दिसत असल्यामुळे उत्पादन चांगले येणार असल्याची आशा बळीराजाला लागून आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे कापसाच्या कैऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे उत्पादनात देखील नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये बंद दारावर चर्चा

Elections : निवडणुका येताच भाजपनं टाकला पहिला डाव; मुख्यमंत्र्यांचा प्लान ठरला, VIDEO

Friday Horoscope : गणरायांची कृपा होणार; अचानक धनलाभाचा योग; ५ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार

Dry Skin Care: बदलत्या वातावरणामुळे चेहरा ड्राय आणि डल पडला आहे? मग रोज करा हा साधा घरगुती उपाय

RBI चा मोठा निर्णय! कार, स्मार्टवॉच अन् टीव्हीद्वारे करता येणार UPI पेमेंट

SCROLL FOR NEXT