Pachora News Saam tv
ऍग्रो वन

Pachora News : आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon Pachora News : मागील काही दिवसांपासून संदीप पवार हे आर्थीक विवंचनेत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

Rajesh Sonwane

पाचोरा (जळगाव) : कर्जबाजारीपणा व आर्थिक विवंचनेतून होत असलेल्या शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. याच दरम्यान आणखी एका (Farmer) शेतकऱ्याने याच कारणातून आत्महत्या केल्याची घटना भोजे (ता. पाचोरा) येथे समोर आली (Jalgaon) आहे. १० मार्चला रात्रीच्या सुमारास या शेतकऱ्याने गळफास घेत जीवन संपविले. (Breaking Marathi News)

पाचोरा (Pachora) तालुक्यातील भोजे येथील संदीप पवार असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून संदीप पवार हे आर्थीक विवंचनेत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. याच कारणातून रविवारी रात्री त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांत मृत्यूची नोंद केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळी समोर आली घटना 

संदीप पवार यांनी १० मार्चला रात्री परिवारातील सदस्यांसोबत जेवण केले. यानंतर सर्वजण झोपून गेल्यावर संदीप यांनी दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर पवार कुटुंबीयांनी आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT