Unseasonal Rain Saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rain : जळगावसह धुळ्यात अवकाळी पाऊस; गहू, हरभरा पिकाला फटका

Jalgaon Dhule News : मागील तीन- चार दिवसांपासून उष्णतेची लाट आली होती. तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर पोहचला होता. दरम्यान उन्हाचे चटके अधिक तीव्र होत असताना आज आलेल्या अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

Rajesh Sonwane

जळगाव/धुळे : हवामान खात्याकडून राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण होऊन (Jalgaon) जळगावसह धुळ्यातील काही भागात अवकाळी पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली. या दिवसाचा फटका काढणीला आलेल्या गहू व हरभरा पिकाला बसण्याची शक्यता आहे.  (Tajya Batmya)

मागील तीन- चार दिवसांपासून उष्णतेची लाट आली होती. (Temperature) तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर पोहचला होता. दरम्यान उन्हाचे चटके अधिक तीव्र होत असताना आज आलेल्या अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार (Dhule) धुळे वर जळगाव जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यात सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान विजाच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

गहू, हरभऱ्याचे नुकसान 
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी काढणीला आले आहेत. अनेक शेतकरी (Farmer) गहू काढणीच्या तयारीत आहेत. तर काहींनी हरभरा कापून ठेवला आहे. आजच्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी चिंतेत सापडला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : लोणावळा रेल्वे मार्गावर १० दिवस ब्लॉक

Kankavli Politics : आमदार निलेश राणे संदेश पारकरांच्या घरी, मंत्री उदय सामंत उपस्थित

Success Story: रोज ७-८ तास अभ्यास, रेल्वेत नोकरी करत दिली UPSC; तिसऱ्या प्रयत्नात IAS; रिया सैनी यांचा प्रेरणादायी प्रवास

Kendra Trikona Rajyog: शनीने तयार केला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींचं नशीब बदलून मिळणार घवघवीत यश

Dharmendra Death: महानतेचं उदाहरण...! धर्मेंद्र यांच्या निधनाने अमिताभ बच्चन भावूक, जिगरी दोस्तासाठी लिहिली खास पोस्ट

SCROLL FOR NEXT