Farmer Suicide Saam tv
ऍग्रो वन

Farmer Suicide: नापिकी, कर्जाच्‍या बोज्‍यातून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

नापिकी, कर्जाच्‍या बोज्‍यातून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

अमळनेर (जळगाव) : तालुक्यातील भरवस व मांडळ येथील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ३५ वर्षीय शेतकऱ्यांनी विष प्राशन व गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याच्या घटना घडल्या आहेत. (Jalgaon News Farmer Suicide)

भरवस (ता. अमळनेर) येथील सुनील लोटन पाटील (वय ३५) याने ३० जुलैला रात्री आठच्या सुमारास तणनाशक विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या (Farmer Suicide) करण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्रास होऊ लागल्याने रात्री खाजगी दवाखान्यात दाखल केले. उपचार सुरु असताना रात्रीच त्यांचा मृत्यू झाला. मनोज मनसाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीवरुन मारवड पोलिसात (Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार किशोर पाटील करीत आहेत. मयत सुनील यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर कर्ज असल्याने ते काही दिवसांपासून त्या विवंचनेत असल्याचे सांगण्यात आले.

पहाटेच घेतला गळफास

तर दुसरी घटना मांडळ येथे घडली. येथील दिगंबर संतोष पाटील (वय ३५) हे ३१ जुलैला पहाटे पाचच्या सुमारास म्हाळसा देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खळ्यात गुरांना चारा टाकण्यासाठी जातो, असे सांगून घरुन निघाले. मात्र, घरी परत आले नाही. त्यांचा शोध घेतला असता, त्यांनी खळ्याटील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. त्यांचा भाऊ सुरेश पाटील यांनी दिलेल्या माहितीवरुन मारवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यावरही सोसायटीचे ३५ हजारांचे कर्ज होते. सतत पाऊस होत असल्याने शेतात मोठ्या प्रमाणात तण वाढल्याने ते त्या चिंतेत होते. या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीड पुन्हा चर्चेत; पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

SCROLL FOR NEXT