Farmer Suicide saam tv
ऍग्रो वन

Suicide: शेतकऱ्याची विष घेवून आत्‍महत्‍या; कर्जाचा बोजा असल्‍याचे कारण

शेतकऱ्याची विष घेवून आत्‍महत्‍या; कर्जाचा बोजा असल्‍याचे कारण

Rajesh Sonwane

जळगाव : विटनेर (ता. जळगाव) येथील शेतकऱ्याने कर्जाच्या विवंचनेतून विष घेवून आत्‍महत्‍या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon news Suicide by poisoning a farmer The reason for the debt)

विटनेर (ता. जळगाव) (Jalgaon) येथील शेतकरी गोकुळ पांडुरंग वराडे (वय ४९) असे मयत शेतकऱ्याचे (farmer) नाव आहे. गोकुळ वराडे हे मकरसंक्रातीच्‍या दिवशी शेतात फवारणीसाठी गेले होते. या दरम्यान त्यांनी विषारी द्रव्य सेवन केले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटूंबियांनी त्यांना तात्‍काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) दाखल केले. परंतु, उपचारादरम्‍यान रविवारी त्यांचा मृत्‍यू झाला.

स्‍टेट बँकेकडून कर्ज

वराडे त्यांच्याकडे स्वमालकीचे विटनेर शिवारात एकूण ८० आर जमिनीचे क्षेत्र आहे. त्‍यांनी जळके स्टेट बँक शाखेतून शेतासाठी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या नैराश्यातून त्‍यांनी आत्महत्या (Farmer Suicide) केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: 'महिनाभरापूर्वीच ओमराजेंच्या बंडाचं प्लॅनिंग', भावानेच केला मोठा गौप्यस्फोट

Mumbai Crime: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या, तो भोसकत राहिला मुंबईकर बघत राहिले

ठाकरेंच्या ६ बंडखोर खासदारांबाबत पावसाळी अधिवेशनापूर्वी निर्णय?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी जमा? पाहा नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, कर्कीसह अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस

SCROLL FOR NEXT