पशुसंवर्धन मंत्री केदार 
ऍग्रो वन

पशुवैद्यकीय संपाबाबत लवकरच तोडगा; पशुसंवर्धन मंत्री केदार यांचे आश्‍वासन

पशुवैद्यकीय संपाबाबत लवकरच तोडगा; पशुसंवर्धन मंत्री केदार यांचे आश्‍वासन

साम टिव्ही ब्युरो

भडगाव (जळगाव) : पशुवैद्यकीय पदविकाधारकांच्या सेवेवर टाच आणल्याने त्यांनी राज्यभर संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याबाबत पशुचिकित्सा व्यवसायी संघटना व खासगी पशुधन पदविका संघटनेच्यावतीने आमदार किशोर पाटील यांना निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आमदार किशोर पाटील यांनी आज (ता. २८) पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन पदविकाधारकांची कैफियत मांडली. त्यावर मंत्र्यांनी कारवाईचे आदेश मागे घेत लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. (jalgaon-news-Settle-on-veterinary-strike-Assurance-of-Animal-Husbandry-Minister-sunil-Kedar)

पशुवैद्यकीय पदविकाधारकांना बोगस डॉक्टर म्हणत त्यांना प्रॅक्टीस करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील पशुवैद्यकीय पदविकाधारकांनी एकत्र येत संपाचे अस्त्र काढले आहे. त्यांनी राज्यभरात जनावरांवर उपचार करणे थांबवले आहे. त्यामुळे राज्यात पशुपालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातही अपुऱ्या पशुवैद्यकीय पदवीधारकांच्या संख्येमुळे जनावरांवर उपचाराबाबत हेळसांड होत आहे. भडगाव तालुक्यात एकच खासगी पदवीधारक आहे. ते एकटे उपचारासाठी कुठे कुठे जातील, हा प्रश्न आहे. तर तालुक्यात पाच वर्ग एक म्हणजे पदवीधारक पशुवैद्यकीय डॉक्टर कार्यरत दवाखाने आहेत. मात्र, ती सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. सर्व दवाखान्याचा पदभार हा प्रभारी डॉक्टरांच्या खांद्यावर आहे. त्यांना सर्व ठिकाणी जाणे शक्य नाही. तिच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झाली आहे. उपचाराअभावी अनेक ठिकाणी पशु दगावल्याची घटना घडल्या. याबाबत पाचोरा व भडगाव तालुक्यातील पशुचिकित्सा व खासगी पशुधन पदविका सेवा संघटनेने आमदार पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावेळी त्यांनी संटनेच्या पदाधिकाऱ्यांना यावर मंत्र्याची भेट घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार

कारवाई करू नये; जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

आमदार पाटील यांनी बुधवारी (ता. २८) राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन पदविकाधारकांच्या विषयावर चर्चा केली. तर पदविकाधारकाच्या संपामुळे पशुपालकांच्या होत असलेल्या त्रासाबद्दल कैफियत मांडली. यावर मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच पदविकाधारकांबद्दल निर्णय घेतला जाईल. तर त्यांच्यावर कारवाई करू नये, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन पदविकाधारकांना प्रॅक्टीस करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी केली. त्यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत लवकरच कायम निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तर कोणावरही कारवाई करू नये, असे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पदविकाधारकांनी संप मागे घेऊन सेवा सुरू करावी.

- किशोर पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळ्यात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन

नवरात्रीत मुंबई लोकलमध्ये रंगला गरबा; लोकल ट्रेनमधील महिलांच्या गरब्याची सोशल मीडियावर चर्चा, पाहा व्हिडिओ

CJP Protest: आशुतोष रांका, सौरव दास यांच्या अडचणी वाढणार? ५ दिवस नाही तर २ ते ५ वर्षे होऊ शकतो तुरुंगवास, कायदेतज्ज्ञांनी काय सांगितलं?

Car tyre pressure: कारच्या टायरमध्ये किती PSI हवा असावी?

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना राज्य सरकारनं दिलं दिवाळीचं गिफ्ट; महायुती सरकारनं घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT