Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News: अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून संपविले जीवन

अल्पभूधारक शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून संपविले जीवन

साम टिव्ही ब्युरो

पहूर (जळगाव) : कर्जाला कंटाळून लोंढरी (ता. जामनेर) येथील अल्पभूधारक (Farmer) शेतकऱ्याने घराच्या बाजूलाच पत्राच्या अँगलला गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. (Letest Marathi News)

कर्जबाजारीतून शेतकरी आत्‍महत्‍या सुरूच आहेत. यात अजून एका शेतकरी आत्‍महत्‍येचा आकडा वाढला आहे. पिकांचे उत्‍पन्‍न अपेक्षीत न झाल्‍याने वाढलेला कर्जाचा बोजा तसेच मुलाच्‍या लग्‍नाचे कसे करायचे; याची विवंचना आनंदा रामदास चौधरी यांना होती. यातून त्‍यांनी टोकाचे पाऊल उचलल्‍याचे ग्रामस्‍थांकडून सांगितले जात आहे.

कर्ज अन्‌ लग्‍नाची चिंता

लोंढरी (ता. जामनेर) येथील अल्पभूधारक शेतकरी आनंदा रामदास चौधरी (वय ५५) यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत होता. त्यातच अविवाहित मुलाच्या लग्नाची चिंता त्यांना सतावत होती. यामुळे त्यांना आलेल्या नैराश्यातच त्यांनी टोकाचे पाऊल उचलून गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या पश्‍चात १ मुलगा, पत्नी, २ विवाहित मुली असा परिवार आहे. चावदस रामदास चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी भरत लिंगायत तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

SCROLL FOR NEXT