Fertilizer  Saam tv
ऍग्रो वन

खतांच्‍या किंमती चारशे रूपयांनी वाढणार; रशिया– युक्रेन युद्धाचा परिणाम

खतांच्‍या किंमती चारशे रूपयांनी वाढणार; रशिया– युक्रेन युद्धाचा परिणाम

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : रशिया व युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातही पहावयास मिळत आहे. यात अनेक वस्तुंच्या किंमती देखील वाढल्‍या आहेत. प्रामुख्याने खरिप हंगामात लागणाऱ्या खतांच्या किंमतींवर देखील त्याचा परिणाम होण्याचा अंदाज असून दरवाढ अटळ मानली जात आहे. (jalgaon news Fertilizer prices will go up Russia Ukraine war impact)

खरिप हंगाम लवकरच सुरू होणार आहे. त्यात पिकांसाठी जिल्ह्यात ९६ हजार मेट्रिक टन खतांचा साठा आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्याला खरीप हंगामात एकूण अडीच लाख मेट्रिक टन खतांची आवश्यकता असते. उपलब्ध साठा व खतांची उपलब्धता पाहता तो कमी आहे. यामुळे खतांच्या (Fertilizer) किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. किंमती वाढण्याअगोदरच शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आतापासूनच खतांची खरेदी करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

कृषी विभागाला भिती

रशिया (Russia), युक्रेन व बेलारूस या देशांव्यतिरीक्त भारत कॅनडाकडून खतांची आयात करतो. मात्र, कॅनडानेदेखील पोटॅशचे उत्पादन करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम खतांच्या बाजारपेठेवर होवून, खतांचे भाव वाढण्याची शक्‍यता आहे. युद्ध आणखी काही दिवस कायम राहिल्यास, खतांच्या आवकेवर परिणाम होईल. त्यातच खतांचे भावदेखील वाढतील, अशी भिती कृषी विभागाने व्यक्‍त केली आहे.

४०० रुपयांनी वाढ?

खतांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या पोटॅशची आयात भारतात रशियाकडूनच केली जाते. युद्ध सुरु झाल्यानंतर पोटॅश व फॉस्फरसच्या कच्च्या मालाचा पुरवठाच कमी झाल्यामुळे खतांच्या किमतीत ४०० ते ५०० रुपयांची वाढ होण्याची शक्‍यता आहे. खरीप हंगामाला सुरवात झाल्यानंतर या युद्धाचे कारण देवून, मोठ्या प्रमाणात काळा बाजार होण्याचीही शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT