Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : शेतातून घरी जाताना होत्याचे नव्हते झाले; शेतकऱ्यासोबत भयंकर घडलं!

Jalgaon Tragedy News : शेतीकाम करून तरूण कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान २ ऑक्टोबरला देखील तो शेतावर गेला होता.

Rajesh Sonwane

जळगाव : शेतात काम आटोपून घरी परत जात असताना शेतकरी पायीच गिरणा नदीतून जात होते. नदीतून जात असताना अचानक पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने या प्रवाहात वाहून गेल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सदरची घटना जळगाव तालुक्यातील कानळदा येथे घडली. 

जळगाव (Jalgaon News) तालुक्यातील कानळदा येथील जितेंद्र शांताराम बाविस्कर (वय ३१) असे घटनेत मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतीकाम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान २ ऑक्टोबरला देखील ते शेतात कामासाठी गेले होते. दरम्यान दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शेतातून काम आटोपल्याने घरी जाण्यासाठी निघाले होते. (Girna River) गिरणा नदीतून मार्ग असल्याने नेहमीच्याच रस्त्याने ते मार्गस्थ झाले होते. नदीतून घरी जात असताना पाण्याचा मोठा प्रवाह आला. त्यातच शेतकरी जितेंद्र बाविस्कर हे वाहून गेले. 

सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना देखील याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर त्यांचा शोध घेण्यास सुरवात करण्यात आली. मात्र अंधार झाल्याने त्यांचा शोध लागला नाही. दरम्यान आज पुन्हा शोधकार्य सुरु केल्यानंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास ग्रामस्थांना जितेंद्रचा मृतदेह आढळून आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घरातील करता पुरुष गेल्याने कुटुंब सुन्न झाले आहे. जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Stories: 86 व्या वर्षीही काम करण्याची वेळ; हॉस्पिटलचा खर्चासाठी भागवण्यासाठी अभिनेत्याची धडपड

हरभजन सिंह यांच्यासह ७ खासदार भाजपात जाणार, वाचा लिस्ट

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

SCROLL FOR NEXT