Banana Crop Saam tv
ऍग्रो वन

Banana Crop: केळीवर सीएमव्हीचा प्रादुर्भाव; साडेसात एकरातील केळीची खोडे फेकली उपटून

Jalgaon News : केळीवर सीएमव्हीचा प्रादुर्भाव; साडेसात एकरातील केळीची खोडे फेकली उपटून

संजय महाजन

जळगाव : रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात केळीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असते. यात मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील शेतकऱ्याने साडेसात एकर क्षेत्र असलेल्या शेतात तेरा हजार केळीची (Banana Crop) लागवड केली होती. परंतु यावर सीएमव्हीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे या शेतकऱ्याने सर्व केळी काढून फेकली आहे. (Tajya Batmya)

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथील भाऊराव पाटील या शेतकऱ्याने आपल्या शेतात जून महिन्यात साडेसात एकर क्षेत्रात केळीचे तेरा हजार रोपांची लागवड केली होती. केळीचे रोप तीन महिन्याचे झाले असताना यावर सीएमव्हीचा प्रादुर्भाव जाणवू लागला. केळीवरील या व्हायरसवर काही पर्याय नसल्याने या (Farmer) शेतकऱ्याने लागवड केलेली तेरा हजार केळीची खोडे शेतातून काढून टाकले आहेत.

मोठे आर्थिक नुकसान 

आधीच शेतकरी केलेला भाव नसल्याने अडचणीत सापडला आहे. त्यातच वादळी वाऱ्याने शेतात आलेली केळीचे झाडे उन्मळून पडले आहेत. आता या सीएमव्हीच्या प्रादुर्भाव आल्याने सर्व रोप उपटावी लागली आहेत. यावर केलेला खर्च आता भरून निघणार नाही. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यावरती आत्महत्येचे संकट उभा राहिल्याचं शेतकरी यांनी बोलून दाखवलेला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कारच्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू;भंडारा - पवनी महामार्गावरील घटना

आता जमिनीची वाटणी होणार मोफत, फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Earthquake : मणिपूरला भूकंपाचे हादरे! ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Gold Rate Today: खुशखबर! चांदी ₹१०,०००नी स्वस्त ! सोन्याचे दर किती? वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Periods Mental Health : पीरियड्समध्ये न चुकता करा 'ही' कामे, चिडचिड अन् मूड स्विंग्स होणारच नाही

SCROLL FOR NEXT