Chalisgaon Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : कर्जाचा डोंगर, दुबार पेरणीचे संकट; तणावातून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

कर्जाचा डोंगर, दुबार पेरणीचे संकट; तणावातून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : डोक्यावर कर्जाचा डोंगर त्यातच महिनाभरापासून पाऊस नसल्याने दुबार पेरणी करावी लागली. यामुळे धास्तावलेल्या (Farmer) शेतकऱ्याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना (Chalisgaon) चाळीसगाव तालुक्‍यातील शिदवाडी (ता. चाळीसगाव) येथे घडली. मेहूणबारे पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra News)

शिदवाडी (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी नेताजी रामदास पाटील (वय ६८) हे शेती करून कुटुंबाची गुजरान करत होते. नेताजी पाटील यांच्यावर शेतीचे तसेच बाहेरील कर्ज होते. त्यातच यंदा पाऊस वेळेवर पडला नाही. म्हणून दुबार पेरणी करावी लागल्याने ते चिंतीत होते. याविषयी ते सतत चिंता व्यक्त करायचे. या दरम्‍यान गुरूवारी (६ जून) सकाळी ९ वाजता ते गावातीलच लक्ष्मण कोठारे यांच्या शेतात कामाला गेले. सायंकाळी ४ वाजता पाऊस झाल्याने परिसरातील शेतकरी घरी गेले. मात्र नेताजी पाटील हे सायंकाळी घरी परतले नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबियासह गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता कोठारे यांच्‍या शेतातील विहिरीजवळ बुट दिसून आले. त्यामुळे नेताजी पाटील यांनी विहीरीत उडी मारून जीवाचे बरेवाईट केल्याची कुटुंबियाला शंका आली.

दुसऱ्या दिवशी काढला मृतदेह

दरम्‍यान शुक्रवारी (७ जून) सकाळी शेतातील राखण करणाऱ्या पावरा समाजाच्या मजुरांनी विहीरीत उतरून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र विहरीतील पाणी खोल व गाळ असल्याने त्यांच्याकडून थांगपत्ता लागला नाही. शेवटी उपखेड येथील एका इसमास बोलावल्यानंतर त्याने विहीरीत उडी घेऊन पाण्यातील गाळातून नेताजी पाटील यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर त्यांचा मृतदेह ग्रामीण रूग्णालय मेहूणबारे येथे नेण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संजय नाना पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT