घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील पाझर तलाव फुटून पिकांचे प्रचंड नुकसान लक्ष्मण सोळुंके
ऍग्रो वन

घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील पाझर तलाव फुटून पिकांचे प्रचंड नुकसान

घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील पाझर तलाव फुटून पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे ३०० एकर क्षेत्रावरील पिकं पाण्याखाली गेली आहेत.

लक्ष्मण सोळुंके

जालना: जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे मंगरूळ गावात असलेला जलसंधारण विभागाने बांधलेला १५ वर्षे जुना पाझर तलाव फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या जवळ पास 300 एकर जमिनीवरील पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. (Huge damage to crops due to rupture of pazhar lake in Ghansawangi taluka)

हे देखील पहा -

मध्यरात्री चार वाजेच्या सुमारास परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे या तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक आल्याने आणि गेल्या पंधरा वर्षात तलावाकडे जलसंधारण विभागाने दुर्लक्ष केल्याने हा पाझर तलाव पुरून शेकडो एकर जमिनीवरील पिकं वाहून गेले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. हा बंधारा फुटल्याने किमान 300 एकर जमिनीचे शेती क्षेत्रावर परिणाम झाला असून अनेक शेतांमध्ये पिके खरडून गेली आहेत.

इतर शेतांमधील लावणी झालेले पीक पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले आहे. शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rules: LPG आणि PNG वापरणाऱ्यांसाठी नवे नियम; 'या' चुका केल्यास गॅस सिलेंडर मिळणे होईल बंद, आताच जाणून घ्या

केसांना लांब आणि दाट बनवण्यासाठी 'या' १० गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: विदर्भात उन्हाचा हाहाकार, तापमान ४७ अंशांवर

Maharashtra Politics: बच्चू कडूंना जबर धक्का! कार्यकर्त्यांनी बदलला 'भिडू'; शेकडो पदाधिकाऱ्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT