Hingoli Heavy Rain Saam tv
ऍग्रो वन

Hingoli Heavy Rain : सेनगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार; वीज पडून महिलेचा मृत्यू, पिकांचे मोठे नुकसान

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाचे आगमन झाले. जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात पावसाने हाहाकार माजविला असून मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे. साधारण पन्नास हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, उडीद व मुगाचे नुकसान झाले आहे. तर वीज कोसळून शेतकरी महिळेच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात जोरदार पावसाचे आगमन झाले. जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा साखरा परिसरात शेतकऱ्यांच्या पन्नास हेक्टरवरील शेतीमध्ये उभी पिके आडवी झाली आहेत. सोयाबीन, तूर, उडीद, मूग या पिकांचे अधिक प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला (Heavy Rain) घास हिरावला गेला आहे. सुरवातीला झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यानंतर बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.  

वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू 

मुसळधार पावसासोबत विजांचा कडकडाट देखील सुरु होता. या दरम्यान साखरा शिवारात पतीसोबत शेतात राबणाऱ्या महिला शेतकऱ्यावर वीज कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या घटनेत या महिलेचा पती देखील वीज कोसळल्याने गंभीर भाजला गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World : धगधगता ज्वालामुखी ते विषारी सापांचा सुळसुळाट, जगातील ७ धोकादायक ठिकाणे

पाकिस्तानची जागेवर पलटी! स्वतःच पोसलेल्या दहशतवाद्यावर ७० लाखांचा 'इनाम'

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

SCROLL FOR NEXT