सोलापुर: एक शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून दोन एकर गांजा लावण्यास परवानगी द्या अशी आगळीवेगळी मागणी केली आहे. या शेतकऱ्याचे नाव अनिल पाटील असे आहे.
हे देखील पहा-
शेतकऱ्याची शिरपूर ता. मोहोळ येथे स्वतःच्या मालकीची 2 एकर जमीन असून या 2 एकर क्षेत्रात गांजा लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. कोणतेही पीक लागवड केले तरी त्याला शासनाचा हमीभाव मिळत नसल्यामुळे त्याला त्याची शेती तोट्यात करावी लागत आहे.
पिकाला कवडीमोल भाव मिळत आल्यामुळे शेती करणे कठीण झालं. मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही. तसेच एखाद्या साखर कारखाण्याला ऊस गाळपासाठी दिला असता, त्याचे देखील बिल लवकर मिळत नाही, त्यामुळे गांजा ला भाव असल्यामुळे या शेतकऱ्याने दोन एकर गांजा लागवड करण्यासाठी जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे मागणी केली आहे.
15 सप्टेंबर पर्यंत लेखी परवानगी द्यावी अन्यथा 16 सप्टेंबर पासून शेतकरी आपल्याला प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे असे गृहीत धरून गांजा लागवड सुरु करणार आहे अशी माहिती शेतकऱ्याने दिली आहे. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्यास प्रशासन जबाबदार राहील असेही या शेतकऱ्याने आपल्या पत्रात नमूद केले आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.