जिल्ह्यात २५ सर्कल कोरडेठाक; पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षाच जयेश गावंडे
ऍग्रो वन

जिल्ह्यात २५ सर्कल कोरडेठाक; पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षाच

जिल्ह्यात आतापर्यंत ८५ मिली पाऊस पडला आहे. १९ सर्कलमध्ये १०० मिलीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ८ सर्कलमध्ये ७५ पेक्षा जास्त पाऊस पडला आहे.

अॅड. जयेश गावंडे

जयेश गावंडे

अकोला : जिल्ह्यात आतापर्यंत ८५ मिली पाऊस पडला आहे. १९ सर्कलमध्ये १०० मिलीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ८ सर्कलमध्ये ७५ पेक्षा जास्त पाऊस Rain पडला आहे. २५ सर्कलमध्ये पेरणीयोग्य पाऊस पडला नाही. आतापर्यंत १ लाख १६ हजार हेक्टरवर म्हणजेच २४.४० टक्के पेरणी झाली आहे, अशी माहिती जिल्हा कृषि अधीक्षक कांताप्पा खोत यांनी दिली आहे. Farmers wait for rain for sowing

हे देखील पहा-

अकोला Akola तालुक्यातील मुंडगाव Mundgaon सर्कलमध्ये सर्वात कमी म्हणजेच ११ मिली पावसाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त पाऊस बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर सर्कलमध्ये २३९ मिली पाऊस पडला आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य जोपर्यंत पाऊस पडत नाही किंवा जमिनीत चांगला ओलावा येत नाही. तोपर्यंत पेरणीसाठी घाई करू नये. अन्यथा बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची, शक्यता नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले आहे.

जिल्ह्यात सोयाबीन पेरणी सर्वात जास्त झाली आहे. आतापर्यंत ६० हजार ५७० हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर कापूस ३४ हजार ५० हेक्टरवर झाली आहे. मूग, उडीद पिकांची पेरणी ५ हजार हेक्टरजवळ झाली आहे. पाऊस लांबला तर मूग, उडीद हे नियोजित क्षेत्र आहे. त्यासोबतच सोयाबीन आणि तूर हे राखून ठेवल्यास, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे ही जिल्हा कृषी अधीक्षक कांताप्पा खोत यांनी सांगितले आहे. Farmers wait for rain for sowing

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपके पुन्हा दिल्लीमधील आंदोलनात सहभागी होणार

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

OTT Releases : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? नव्या चित्रपटांसह वेब सीरिज अन् रिॲलिटी शोची मेजवानी!

SCROLL FOR NEXT