soyabean price, latur bazar saam tv
ऍग्रो वन

Soyabean : एक लाख क्विंटल सोयाबीन घरातच पडून; दीड महिन्यानंतरही सोयाबीन दरात वाढ होईना !

काही व्यापाऱ्यांकडे वजन करून अनामत सोयाबीन ठेवण्यात आले आहे.

दीपक क्षीरसागर

Soyabean Price : दीड ते दोन महिन्यांपासून सोयाबीनचे दर ५ ते साडेपाच हजारांच्या जवळपास राहिल्याने एक लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीन विक्रीविना घरातच पडून आहे. परिणामी, बाजारातही आवक घटली आहे. तेजी मंदीचा अंदाज येत नसल्याने बाजारपेठेतही शुकशुकाट दिसून येत आहे. आगामी काळात तरी दरवाढ होईल की नाही? अशी शंका शेतकऱ्यांतून (farmer) व्यक्त होत आहे.

नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे (soyabean) पाहिले जाते. तालुक्यात दरवर्षी ८५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होतो. गेल्या वर्षी जूनमध्ये सोयाबीनचा दर १० हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काही महिने ७ ते ८ हजार दर राहिला. भाव वाढेल ही अपेक्षा कायम आहे.

सध्या सोयाबीनला ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी (farmers) शेतमाल तारण योजनेअंतर्गत बाजार समितीकडे १ हजार १०० क्विंटल सोयाबीन ठेवले आहे. त्यात गतवर्षीच्या सोयाबीनचा समावेश आहे, तसेच काही व्यापाऱ्यांकडे वजन करून अनामत सोयाबीन ठेवण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांनी घरातही सोयाबीनची साठवणूक केली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT