Latur News Saam Tv
ऍग्रो वन

पोर्टलवर नोंद केली पण हरभरा खरेदी नाही; एका क्विंटलला दीड हजार अनुदान देण्याची मागणी

या शेतकऱ्यांना एका क्विंटलला दीड हजार अनुदान देण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर - अनेक शेतकऱ्यांनी शासकीय पोर्टलवर नोंद केली पण हरभऱ्यांची खरेदी अद्यापही झालेले नाही. या शेतकऱ्यांना (Farmer) एका क्विंटलला दीड हजार अनुदान देण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली असूनही ती तात्काळ द्यावी अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सत्तार पटेल यांनी दिली आहे.

हे देखील पाहा -

गत वर्षी सोयाबीन आणि हरभरा उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन तर शासकीय धोरणामुळे हरभरा उत्पादक संकटात सापडला आहे. चालू वर्षी एक जुनला आवश्यक असलेली हरभरा खरेदी कोटा पूर्ण झाल्याने शासकीय खरेदी बंद केली. पण शेतकऱ्यांकडे हरभरा मोठया प्रमाणावर शिल्लक होता त्यामुळे शासनाने यास 18 जूनपर्यंत खरेदी सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले.

पण पोर्टलवरील अडचणीमुळे खरेदीच्या पावत्या निघत नसल्याने खोलंबा झाला. या शेतकऱ्यांना एका क्विंटलला दीड हजाराचा किमान फटका बसत असूनही त्यांना अनुदान द्यावं अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सत्तार पटेल यांनी केली आहे. मागणी मान्य नाही झाल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Fort : भक्कम दुहेरी तटबंदी अन् वैभवशाली इतिहास, सोलापूरमध्ये तलावाच्या काठी वसलाय भव्य किल्ला

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Accident: समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात; पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले

Deool Band 2 Collection : स्वामी भक्तीत प्रेक्षक तल्लीन! प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, वाचा संडे कलेक्शन

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय अन्यथा...

SCROLL FOR NEXT