अल्पभूधारक तरूण शेतकऱ्याची बॅरेज मध्ये उडी घेऊन आत्महत्या दीपक क्षीरसागर
ऍग्रो वन

अल्पभूधारक तरूण शेतकऱ्याची बॅरेज मध्ये उडी घेऊन आत्महत्या

निराशेपोटी डोंगरगाव बॅरेजमध्ये उडी घेऊन लातुर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव या गावातील तरूण शेतकऱ्याने आत्महत्या

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : अतिवृष्टीने नदी काठावरील ४ एकर शेतीतील सर्वच पिके सडून गेल्याने २ बँकेचे ८ लाख रूपये कर्जाची परफेड कशी करायची, या निराशेपोटी डोंगरगाव बॅरेजमध्ये उडी घेऊन लातुर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव या गावातील तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव या गावातील तरूण अल्पभूधारक शेतकरी अजय विक्रम बन (वय- २४) वर्षे या शेतकऱ्याची नदी पाञाच्या काठावर ४ एकर जमीन आहे. मागे झालेल्या अतिवृष्टीने ४ एकरवरील सर्वच खरीप पिके पाण्यात गेल्याने संपूर्णपणे सडली होती. हजारो रूपयाचे बियाणे घालून, पेरणी केली.

हे देखील पहा-

मात्र, निसर्गाने दगा दिल्याने खरीपाचे हातातोंडाशी आलेले पिके डोळ्यादेखत सडून गेल्याने बँक आॕफ महाराष्ट्र आणि जिल्हा मध्यवर्ती या २ बँकेकडून घेतलेले ८ लाख रूपये कर्ज कसे फेडावे या विवेचनातून सदरीला शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचले आणि आपले जीवन संपविले आहे. नदीकाठावरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने नुकसानभरपाई जाहीर केली होती.

मात्र सदरील शेतकऱ्याला फक्त ४ एकरचे केवळ ७ हजार रूपयेच मदत मिळाली आहे. दिवाळीसारखा मोठा सण सुध्दा या शेतकऱ्याने आर्थिक परिस्थितीमुळे साजरा केला नाही. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई- वडील पत्नी एक ६ महिन्याचा मुलगा आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

SCROLL FOR NEXT